संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ


विनियम क्र. ४/२०१८
“ पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यासंबंधीचे विनियम – २०१८ ”

                             ज्याअर्थी, व्यवस्थापन परिषदेने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा­या खालील नमुद गटातुन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे ‘ पर्यावरण पुरस्कार ’  देण्याचा निर्णय घेतलेला आहे.   

 1.                           त्याअर्थी, उपरोक्त प्रयोजनार्थ विनियम तयार करण्यात येत आहे.
 2. १. हे विनियम ' पर्यावरण पुरस्कार ' प्रदान करण्याबाबतचे विनियम ४/२०१८ म्हणून संबोधण्यात येईल.
 3. २. हे विनियम व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेल्या तारखेपासून अमलात येतील.
 4. 3. प्रस्तावना
                वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन जैवविविधता संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर व जनजागृती करणा­या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे परिक्षेत्रातील सर्व प्रकारचे महाविद्यालय, शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सक्षम प्राधिकारणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था (गट - अ) व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रात पर्यावरणासंबंधी कार्य करणारा व्यक्ती (गट - ब) यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे प्रत्येकी एक ' पर्यावरण पुरस्कार ' देण्यात येईल. या दोन पुरस्काराला गट - अ व गट - ब, असे संबोधण्यात येईल. यासाठी दरवर्षी दि. २ डिसेंबर ' राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण दिनी ' गट - अ व गट - ब यांच्यापैकी निवड झालेल्या प्रत्येकी एक गट - अ व गट - ब यांना विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख बक्षिस देवून गौरविण्यात येईल.
 5. ४. उद्देश
                प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे गट - अ व गट - ब व्दारे पर्यावरणासंबंधी वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर व जनजागृती इत्यादींची आस्था निर्माण करण्यासाठी तथा या कार्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळून त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने ‘ पर्यावरण पुरस्कार ’सुरू करण्यात येत आहे.
 6. ५. निम्नतम योग्यता
                प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे गट - अ व गट - ब व्दारे मागिल 5 वर्षा पासुन पर्यावरणासंबंधी वृक्षारोपन आणि वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर व जनजागृती या क्षेत्रात कार्य करित असतील त्यांना या पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येईल.
 7. ६. पुरस्कार योग्य संवर्ग
                प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे गट - अ व गट - ब या संवर्गातून प्रत्येकी एक यांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. या पुस्काराला गट - अ व गट - ब असे संबोधण्यात येईल.
 8. ७. पुरस्काराचे स्वरूप
                पर्यावरण पुरस्कारा करिता निवड झालेल्या गट - अ व गट - ब मधील प्रस्तावांना खालीलप्रमाणे पुरस्कार देण्यात येतील.
                1) गट अ - रू. 15,000/- रोख रक्कम, विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह,प्रशस्तीपत्र.
                2) गट ब - रू. 10,000/- रोख रक्कम, विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र.
                उपरोक्त पुरस्कार मा.कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अथवा मा.कुलगुरूंच्या समकक्ष असलेल्या मान्यवर व्यक्ती किंवा पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ मान्यवर व्यक्तिंच्या हस्ते समारंभपुर्वक प्रदान करण्यात येतील.
 9. ८. पुरस्कार निवड समिती :- पुरस्काराचे समितीमध्ये एकूण पाच सदस्य राहतील.
  १) अध्यक्ष - अध्यक्ष ( व्य.प.ने नामित केलेले )
  २) सदस्य - १ सदस्य ( व्य.प.ने नामित केलेले )
  ३) विषयतज्ञ - २ सदस्य ( व्य.प.ने नामित केलेले )
  ४) उद्यान अधिक्षक - सदस्य सचिव

  व्यवस्थापन परिषद दोन विषयतज्ज्ञ नामित करतील, या समितीचे अध्यक्ष व एक सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यामधुन नामित करेल. तसेच उद्यान अधिक्षक हे पद्सिध्द सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहतील. विषयतज्ज्ञ हे पर्यावरण संवर्धनांच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे तज्ञ नामवंत व्यक्ति असावेत. संबंधित विषयतज्ज्ञांची अद्यावत यादी विद्यापीठाच्या उद्यान विभागाकडे उपलब्ध असलेल्या यादीतुन दोन विषयतज्ज्ञांची निवड व्यवस्थापन परिषद करेल. व्यवस्थापन परिषदेने नामित केलेले सदस्य, निवड समितीचे सदस्य राहतील.
 10. ९. पुरस्काराची कार्यपध्दती
  • वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन जैवविविधता संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर व जनजागृती या क्षेत्रात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त केलेली सर्व प्रकारचे महाविद्यालय, शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सक्षम प्राधिकारणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी विद्यापीठाच्या ' पर्यावरण पुरस्कारासाठी ' अर्ज करणे अपेक्षित नाही.
  • व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पर्यावरणासंबंधीचे कार्य करणा¬¬­यांना या पुरस्कारा करिता अर्ज करता येणार नाही.
  • नामांकन भरण्याची शेवटची तिथी 31 ऑगष्ट राहील. यासबंधीची जाहीरात विद्यापीठाव्दारे वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात येईल व परिपत्रकाव्दारे कळविण्यात येईल.
  • नामांकन अर्ज विहित नमुन्यात सादर करावयाचे असल्याने सदर नामांकन अर्जाच्या प्रती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे ‘www.sgbau.ac.in’ संकेतस्थळावरून प्राप्त करता येतील. यासंबंधीचे निकष अर्जासोबत जोडलेले आहे.
  • ज्या वर्षासाठी नामांकन अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्याचवर्षी दि. 2 डिसेंबर 'राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण दिनी' पुरस्कार प्रदान करण्यात येईल. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव वरिल तारखेत बदल करण्याचे अधिकार मा. कुलगुरुंना राहतील.
  • निवड समिती, प्राप्त झालेल्या नामांकन अर्जाची छाननी करून, वैध नामांकन अर्ज असलेल्या सर्व प्रकारचे महाविद्यालय, शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सक्षम प्राधिकारणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था गट - अ व व्यक्ति गट - बया गटातून निवड समितीला प्रथमदर्शनी योग्य वाटलेल्या प्रत्येकी पहिल्या तीन कार्यक्षेत्राला प्रत्यक्ष भेटी देवून मुल्यमापन करतील.
  • पर्यावरण पुरस्कार समिती आपल्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करतील. निवड समितीच्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेला मान्य असल्यास गट अ व गट ब यामधुन प्रत्येकी एक यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
  • पर्यावरण पुरस्कारासाठी निवड समितीच्या निष्कर्षानुसार गट - अ व गट - ब यामध्ये पात्र नसल्यास त्या वर्षीचा पुरस्कार देण्यात येणार नाही / घोषित करण्यात येणार नाही. याबाबतचे अंतीम अधिकार व्यवस्थापन परिषदेला राहतील.
  • पुरस्काराचे नामांकन अर्ज पाच प्रतीत भरून पाठविणे अनिवार्य राहील.
  • कलर फोटोच्या प्रती प्रस्तावासोबत सादर कराव्या व तसेच इतर सर्व दस्ताऐवजाच्या सत्यप्रती साक्षांकित असणे अनिवार्य राहील.
  • पर्यावरण पुरस्काराच्या नावातील वर्ष दरवर्षी बदलविण्यात येईल.
  • गट – अ मधुन नामांकन भरणारे महाविद्यालय, शाळा यांनी राष्ट्रीय सेवा योजना व हरित सेना योजनेकडून केलेल्याच कार्याचा केवळ उल्लेख असू नये. तर प्रत्यक्ष शाळा व महाविद्यालयाव्दारे इतर विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या सहकार्याने केलेल्या कार्याचा उल्लेख प्रस्तावात असणे आवश्यक राहील. केवळ राष्ट्रीय सेवा योजना व हरित सेना योजनेच्या कार्यावरून या पुरस्कारासाठी विचार केल्या जाणार नाही. हिच अट गट - ब गटासाठी देखील लागु राहील.
  • सदर पुरस्कार प्राप्त करणा­या गट - अ व गट - ब संवर्गातील कमीत कमी 05 वर्ष पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • पर्यावरण पुरस्काराबाबतचे नियम व अटी तसेच निर्णयाबाबत अंतिम अधिकार विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेकडे राहतील.
  • पुरस्कार नामांकन अर्ज ‘ कुलसचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती ’ यांचेकडे नोंदणीकृत डाकेव्दारे पाठवावे. विहित नमुन्यात व प्रतीत नामांकन अर्ज प्राप्त न झाल्यास अथवा विहित तिथीपर्यंत विद्यापीठाला प्राप्त न झाल्यास सदर प्रस्तावावर विचार केल्या जाणार नाही. दि. 31 ऑगष्ट या नामांकनाच्या अंतीम तिथीला कोणत्याही प्रकारची सुटी असल्यास त्यानंतर पुढील कार्यालयीन कामकाजाचा दिवस अंतीम तिथी समजण्यात येईल.
 11. १०. पर्यावरण पुरस्कारा करिता गट - अ व गट - ब या संवर्गाकरिता नामांकन अर्ज, निकष, प्रमाणपत्र, बँनरचे व स्मृती चिन्हाचे स्वरुप, खर्चाचा आराखडा विहीत करण्यात आलेला आहे. ते प्रपत्र अ,ब,क,ड,इ,ई,फ,ग,ह वर जोडण्यात आलेले आहे.
 12. ११. पुरस्कार प्रदान केल्यानंतर या संबंधीची माहिती विद्यापीठाच्या राजपत्रात व वार्षिक अहवालामध्ये प्रसिध्द करण्यात येईल.